PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 22, 2024   

PostImage

स्त्रीयांच्या बाबतीत भगवान बुद्धांची वचने


बुध्द,धम्म आणि संघ ह्या त्रिरत्नांच्या प्रती अनेक लोकांमध्ये बरेच समज - गैरसमज आहेत, त्यांच्यापैकीच एक म्हणजे अनेक स्त्री - वादी लोक भगवान बुध्दांना भारतीय स्त्रियांच्या अवनतीचे कारण मानतात,त्यांच्या मते भगवान बुद्धांनी आपल्या संघातील भिक्खुणींसाठी जे काही नियम केले होते,त्याने भारतीय स्त्रीया ह्या गुलामगिरी मध्ये तर ढकलल्या गेल्याच,पण त्यातून बुद्धांची स्त्री विषयक मान्यता समजते ती म्हणजे,भगवान बुद्धांना स्त्री - पुरुष समानतेचा गंध मुळीच नव्हता,यावर स्त्री जन्म वाईट असतो,स्त्रीया पुरुषांच्या गुलाम असतात, वास्तवात धम्म कसल्याही प्रकारची विषमता शिकवीत नाही, मग ती जाति - आधारित असो किंवा लिंग - आधारित,स्त्रीचा जन्म वाईट असतो किंवा स्त्रीया पुरुषांची गुलाम असतात असे त्रिपिटकात बुध्दांचे एकही वचन नाही, याउलट स्त्री जन्माची बुध्द स्तुती करतात, स्त्रीया ह्या श्रेष्ठ असतात,असे सांगणारी अनेक बुध्दवचने आहेत...,

 

१. मुलीच्या जन्माने उदास होऊ नका,एखादी स्त्री देखील पुरुषा पेक्षा श्रेष्ठ असते,( संदर्भ : संयुक्त निकाय,सगाथ वग्ग,कोसल संयुत्त - मल्लिका सुत्त )

 

२. धम्म महत्त्वाचा,स्त्रीत्व अथवा पुरुषत्व नव्हे,स्त्री असो किंवा पुरुष असो,ज्या व्यक्तीकडे धम्माच्या स्वरुपातील यान असते, ती व्यक्ती या यानाद्वारे निर्वानाजवळ पोहोचते,( संदर्भ : संयुक्त निकाय,देवता संयुक्त, आदित्तवग्ग,अच्छरासुत्त)

 

३. पत्नी हि सखी आहे,दासी नाही,( संदर्भ : संयुक्त निकाय, देवता संयुक्त,जरावग्ग,वत्थुसुत्त )

 

 ४. गुणसंपन्न,बहुश्रुत,धम्मधर भिक्खुनी व उपासिका म्हणजे संघाची शोभा,( संदर्भ : अंगुत्तर निकाय,चतुक्कनिपात,भंडगाम वग्ग,सोभन सुत्त )

 

५. निर्वाण मार्गावर चालत असतांना माझ्या स्त्रीत्वाचा संबंध काय ... ? माराचा नाश करण्यासाठी माझ्या स्त्रीत्वाचा संबंध काय..? ( संदर्भ : संयुक्त निकाय,सगाथवग्ग,भिक्षुनी संयुक्त / थेरीगाथा..)

 

६. धम्मामुळे आत्मविश्वास वाढला,समाजामध्ये इतरांकडुन घाबरविल्या जाणाऱ्या स्त्रीयांनी, समाजाला घाबरविणाऱ्या मारालाच घाबरविले,( संदर्भ : संयुक्त निकाय,सगाथवग्ग, भिक्षुनी संयुक्त / थेरीगाथा )

 

७. शुक्रा नावाची भिक्षुनी मोठ्या धम्मपरिषदेमध्ये हजारो भिक्षु - भिक्षुनीं समोर धम्माचा उपदेश करीत होती,तो उपदेश अमृतासारखा आहे,( संदर्भ : यक्षसंयुत्त,पठमसुक्का सुत्त )

 

८. खेमा भिक्षुणी बद्दल,'ती अत्यंत विद्वान,सुस्पष्ट भुमिका असलेली,बहुश्रुत,उत्तम वक्तृत्व असलेली आणि समंजस आहे, अशी तिची कीर्ती आहे, महाराजांनी तिच्या सेवेत उपस्थित रहावे.' ( संदर्भ : संयुक्त निकाय,अव्याकृत संयुत्त,खेमा सुत्त )

 

९. "कंजगलिका भिक्षुणी उपासकांना उपदेश करते..." तथागत म्हणाले,साधु,साधु,साधु, गृहपतींनो,भिक्षुणी कंजगलिका अत्यंत विद्वान आहे,महाप्रज्ञावान आहे,तुम्ही माझ्याकडे येऊन मला विचारले असते तरी मी सुध्दा हेच सांगीतले असते,( संदर्भ : अंगुत्तर निकाय,दस्सक निपात,महावग्ग, दुतिय महापञ्हा सुत्त )

 

१०. प्रतिष्ठित लिच्छवींसाठी आम्रपालीचे भोजन नाकारले नाही,त्यांनी आम्रपाली गणिकेच्या जीवनाला स्वर्ग बनविले,भगवानांनी तिच्यासाठी किती अमुल्य कार्य केले हे तिच्या थेरीगाथां शिवाय कसे समजणार ... ? ( संदर्भ : दिघनिकाय,महापरिनिब्बाण सुत्त/ थेरीगाथा )

 

११. भगवानांनी गणिकेला परिव्राजिका बनविले,तर विरोधकांनी परिव्राजिकांना गणिका बनविले,तथागतांच्या चरित्र्यावर शिंतोडे उडविण्यासाठी कारस्थाने केली गेली,( उदा. - चिंचा आणि सुंदरी परिव्राजीका, धम्मपद अट्ठकथा, १३- लोकवग्ग, गाथा क्रं. १७६ ) ( उदानपाळी,मेघिय वग्ग,सुंदरी सुत्त...)

 

१२. पापी मार : जे स्थान ऋषींना सुध्दा प्राप्त करता आले नाही,जे इतरांच्याद्वारे प्राप्त करण्यास अत्यंत कठीण आहे,ते तुझ्यासाखी दोन बोटांएवढे प्रज्ञा असणारी स्त्री कसे प्राप्त करेल..?

सोमा भिक्षुणी : चित्त सुस्थीतीत असतांना,ज्ञान उपस्थित झाले असतांना,धर्माची सम्यक विपश्यना घडली असतांना,माझे स्त्रीत्व काय करेल..? भगवान बुध्दांनी भिक्षुणींमध्ये निर्माण केलेल्या आत्मविश्वासामुळे सोमा भिक्षुणी पापी माराला असे बोलु शकली,( संदर्भ : संयुक्त निकाय,सगाथवग्ग,सोमासुत्त )

 

१३. भगवान बुध्द धम्मदिनेची स्तुती करतात,( संदर्भ : मज्झीम निकाय ४४ )

 

 वरील बुद्ध वचनांवरून ठरवा भगवान बुध्दांचा धम्म हा स्त्रीयांच्या विकासासाठी कारणीभुत ठरला की,त्यांच्या खच्चीकरणासाठी ? 

 

बुध्दांच्या धम्मामुळे तत्कालीन भारतीय समाजामध्ये स्त्रीया ह्या गुलामगिरीत ढकलल्या गेल्या असे तुम्हाला वाटते का..?

 

वास्तवात,स्त्री पुरुष समतेचा आधुनिकतेला तरी गंध आहे का..? आजच्या आधुनिक युगापेक्षा बुध्दकाळ हा भारतभुमीचा स्वर्गकाळ होता,तो काळ आजच्या पेक्षा किती तरी पुरोगामी आणि श्रेष्ठ होता,त्यांच्या काळात बुध्दांनी एका वेश्येला आपल्या संघात मानाचे स्थान दिले,या काळात तो मिळतो का..? 

 

🙏🌹 *नमो बुद्धाय* 🌹🙏